भूक | काळीज पिळवटनारी कविता

भूक | काळीज पिळवटनारी कविता

पोट झालं रे रिकामं, वेदना ही मोठी झाली,
भुक लागलीय खुप, वेदना जीवाला मिळाली ।।

कासावीस झाला जीव, आता अश्रू मी गिळले,
नाही जीणं आता मोठं, देवा कळुन चुकले ।।

पोटाची ही उपासमार, आता टाळते स्वःताला,
कैसे जगावे मी आता, द्यावे अन्न या भुकेला ।।

गालावर आले अश्रु, पुसन्या राहिले ना त्रान,
मृत्यु आला ओढावुन, जाऊ लागली ही जान ।।

ना क्षण आनंदाचे, मला नशिबी लाभले,
पोटाच्या या भुकेपायी, दुःख डोळ्यात उसळले ।।
  
 - कवी प्रशांत सर (संगमनेरकर) ©

(© कवी प्रशांत सर (संगमनेरकर), २०२६ या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)

भूक मराठी कविता – उपासमार, गरिबी आणि वेदनांनी ग्रासलेल्या जीवनाचे भावनिक चित्रण

 भावार्थ :
          या कवितेत मी भुकेच्या वेदनेला केवळ शारीरिक गरज म्हणून नाही, तर अस्तित्व पोखरणाऱ्या शक्तीप्रमाणे अनुभवतो. रिकाम्या पोटाची जळजळ माझ्या संपूर्ण जीवनावर अधिराज्य गाजवते, आणि प्रत्येक श्वास वेदनेने भरून जातो, अशी माझी अवस्था आहे. मी अश्रूंनाही गिळतो, कारण रडण्याचीही ताकद उरलेली नाही. जगणं निरर्थक वाटू लागलं आहे, ही माझी अंतर्मनातील कबुली आहे. उपासमार मला स्वतःपासून दूर नेत आहे, आणि मृत्यूच जणू एकमेव मार्ग उरतो, अशी भावना निर्माण होते. या कवितेतून मी सांगतो. भूक ही केवळ अन्नाची कमतरता नसून, ती माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवणारी, निर्दयी आणि असह्य वेदना आहे.

📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने