एकीचे बळ | मराठी कविता

एकीचे बळ |मराठी कविता

एकट्याने वाऱ्याशी झुंजतो वृक्ष एकला,
पण रानभर उभे राहिले, जेव्हा जोड मिळाला ।।

एका फांदीला वादळ मोडते क्षणात जरी,
एकत्र उभे राहिले, तर मोडेना कुणी तरी।।

थेंब थेंब मिळता झाला, सागर अथांग होतो,
एकट्या दिव्याने अंधार कधी कुठे टळतो?

पण असंख्य ज्योती एकवटल्या जेव्हा एकठायी,
उजळून निघे जग सारे उरे ना अंधाराची सायी.

मातीचा कण एकटा उडतो वाऱ्यात हरवून,
पण मूठभर माती घट्ट एकत्र येता मिळून ।।

बनते त्यातून भिंत आधार, आसरा, घर,
एकट्याने काय मिळते? फक्त रिकामा पसर ।।

पाखरे एकट्याने उडती, लांब न जाती कधी,
थव्याने उड्डाण केले तर, आकाशास मर्यादा नाही।।

संकटात एकमेकांची ढाल होऊनी उभे राहा,
एकीचे बळ जाणले ज्याने त्याने जग जिंकले पाहा ।।

नदी एकटी वाहते, रुजवते न खोल नाते,
पण असंख्य नद्या मिळाल्या, सागर तयार होते ।।

तसेच आपण एकत्र आलो, एक ध्येय मनी धरुनी,
अजिंक्य होऊ या जगात एकीचे बळ घेऊनी ।।

एकट्याने रडला वेळी आसू गळती उगाच,
पण एकमेकांच्या खांद्यावर दुःखाला उरे न साच।।

स्पर्शाशिवाय कळते मन, डोळ्यांत दिसते जीव,
एकीच्या बळाने जगणे, हेच खरे जीवनाचे गाणे नीव ।।

                        - कवी प्रशांत सर © (संगमनेरकर)

(© या कवितेचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. लेखकाच्या लिखित परवानगीशिवाय या कवितेचा कोणताही भाग कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा वापर करता येणार नाही.)

एकीचे बळ मराठी कविता – एकत्र येण्याची शक्ती, सहकार्य आणि सामाजिक एकात्मतेचे प्रेरणादायी चित्रण

भावार्थ :
             या कवितेत मी “एकी” या संकल्पनेची ताकद विविध प्रतीकांमधून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. एकटा वृक्ष वादळात कोसळतो, पण जंगल एकत्र उभं राहतं. ही जाणीव मी मांडतो. थेंब एकत्र आले की सागर होतो, तसेच माणसं एकत्र आली तर अपार शक्ती निर्माण होते, असा माझा अनुभव आहे. मी स्वतः जाणतो की एकटेपण मर्यादा घालते, पण एकी सामर्थ्य देते. संकटात एकमेकांची ढाल बनणं हेच खरं जगणं आहे, ही माझी धारणा आहे. या कवितेतून मी सांगतो. ध्येय एक असेल आणि मनं जोडली गेली, तर माणूस अजिंक्य होतो; कारण एकीचं बळ हेच जीवनाचं खरं आधारस्थान आहे.




📖 अशाच प्रकारच्या कविता वाचण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने