सर्वधर्मसमभाव लोकशाही साहित्य मंच महाराष्ट्र राज्य
दि • १७/०३/२०२६
उपक्रम क्र ६३९
विषय : भ्रष्ट राजकारण
शीर्षक : सत्तेचे मुखवटे
सत्तेच्या या रंगमंचावर,
चेहरे बदलती क्षणाक्षणी;
हास्य ओठी, मनात कपट,
खेळ सुरूच पडद्याआडनी.
मतांच्या मोलावर विकती,
स्वप्नं, आशा, जनतेची हाक;
वचनांची उधळण होते,
पण कृती मात्र राहते फाक.
खुर्चीभोवती फिरते सत्ता,
नीती तिथे होते कैद;
न्याय विकला बाजारात,
सत्य उभं राहतं वेदनाग्रस्त.
तरीही जनतेच्या श्वासामध्ये,
आशेचा अजूनही आहे दीप;
एक दिवस या अंधारावर,
उगवेल प्रामाणिकतेचा सूर्यदीप.
◎══════◎══════◎
कवी प्रशांत सर (संगमनेरकर)
◎══════◎══════◎